दिवाळीची गंमत
आईच्या फराळाच्या डब्यावर डोळा ठेवून बसलेला मी,
आणि "जपून खा, सगळ्यांना वाटायचंय" म्हणत ओरडणारी आई!
आजीच्या हातची चव जपणारी सुगरण ती माझी,
"अजून थोडं मीठ घाला" म्हणत फिरते सगळ्या भांड्यांमधी!
दिवाळी म्हणजे...
रांगोळी काढताना पूर्ण घर रंगवणं,
आणि शेवटी सगळं पुसून 'नवीन प्रयत्न' करणं!
पाहुणे आले की फराळाचा डबा लपवणारी भावंडं,
आणि "अहो या ना, या ना" म्हणत त्यांना आवर्जून वाढणारी ती आई!
कपड्यांच्या दुकानात जाऊन वैतागणारा नवरा,
"हे घे ना... नाही ते घे... अरे, दोन्ही घे ना!" म्हणणारी बायको, बिचारा!
अशीच ही दिवाळी येते वर्षानुवर्षे,
रोजच्या आयुष्यात भरते रंग नवे नवे!
तर मग या दिवाळीत साजरी करू आपण,
क्षणांची ही किमया, नात्यांची ही माया!
आनंदाचा हा सण, प्रकाशाचा हा क्षण!
- Parth Jadhav
Comments
Post a Comment