Posts

दिवाळीची गंमत

Image
  आईच्या फराळाच्या डब्यावर डोळा ठेवून बसलेला मी ,  आणि " जपून खा , सगळ्यांना वाटायचंय " म्हणत ओरडणारी आई ! आजीच्या हातची चव जपणारी सुगरण ती माझी ,  " अजून थोडं मीठ घाला " म्हणत फिरते सगळ्या भांड्यांमधी ! दिवाळी म्हणजे ...  रांगोळी काढताना पूर्ण घर रंगवणं ,  आणि शेवटी सगळं पुसून ' नवीन प्रयत्न ' करणं ! पाहुणे आले की फराळाचा डबा लपवणारी भावंडं ,  आणि " अहो या ना , या ना " म्हणत त्यांना आवर्जून वाढणारी   ती आई ! कपड्यांच्या दुकानात जाऊन वैतागणारा नवरा ,  " हे घे ना ... नाही ते घे ... अरे , दोन्ही घे ना !" म्हणणारी बायको , बिचारा ! अशीच ही दिवाळी येते वर्षानुवर्षे ,  रोजच्या आयुष्यात भरते रंग नवे नवे ! तर मग या दिवाळीत साजरी करू आपण ,  क्षणांची ही किमया , नात्यांची ही माया !  आनंदाचा हा सण , प्रकाशाचा हा क्षण !                                                                                                                                                            

आत्मशोध

Image
कोण मी या विश्वाच्या विशाल पटावर ?  शब्दांच्या रंगांनी चित्र रेखाटणारा कलाकार ?  की एकेकाळी ज्ञानाच्या वृक्षाखाली बसलेला जिज्ञासू ? कालपटलावर उमटलेल्या पाऊलखुणांचा साक्षीदार मी का ?  पूर्वजांच्या स्मृतिगाथांचा अमृतकलश जपून ठेवणारा . वात्सल्याच्या अमृतधारेने सिंचित झालेले रोपटे मी का ?  मार्गदर्शनाच्या स्तंभावर टेकून आकाशाला गवसणी घालणारा . रक्ताच्या धाग्यांनी विणलेल्या नात्याचा शिलेदार मी का ? स्मृतींच्या स्वर्णपानांवर कोरलेल्या क्षणांचा चिरंतन साक्षीदार . सुख - दुःखाच्या सागरी साथ देणारा नाविक मी का ?  प्रेमाच्या अनंत लहरींवर हृदयी तरंगणारा सारथी . प्रेमाच्या पालखीत पाखरांना पोसणारा पिता मी का ?  जीवनाच्या वळणावळणी दीपस्तंभ होऊन त्यांना मार्ग दाखवणारा . क्षणभंगुर देहाच्या साच्यात मी केवळ एक आकृती का ?  की निसर्गाच्या महाकाव्यातील एक अनमोल श्लोक ? कालच्या दर्पणात उमटलेले क्षणिक चित्र ? की नामरूपाच्या पलीकडचे अस्तित्वाचे अनाकलनीय गूढ ? केवळ जैविक यंत्रणा , रक्तमांसाचा नश्वर पुतळा ? की चैतन्याच्