What might a tree say if it could?
निघाले असते पाय, तर घातली असती लाथ, हलले असते हात तर नक्कीच केले असते ठार, पृथ्वीवरच्या मनुष्या पोहोचली का रे हाक ? वाढत चालले प्रदूषण बेरंग होत आहे पृथ्वी थोडी तरी लाज बाळगा नाहीतर संपेल सारंच काही. काळजी घेऊ नका माझी फरक पडणार नाही आज, पुढच्या वर्षी जगला हेच झाले मोठे काज. झाडे तोडून दाखवू नका मला तुमची ताकद, एक क्षणही लागणार नाही मला करायला तुमचा कागद. - Parth Jadhav